23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रराष्ट्रपतीसाठी एनडीएला तर उपराष्ट्रपतीसाठी यूपीएला पाठिंबा : संजय राऊत

राष्ट्रपतीसाठी एनडीएला तर उपराष्ट्रपतीसाठी यूपीएला पाठिंबा : संजय राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी (ता. १८) निवडणूक होणार आहे. एनडीएने आदिवासी महिला द्रौपती मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर यूपीएने यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर शिवसेना मुर्मू आणि सिन्हा यांच्यापैकी कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक घडामोडीनंतर शिवसेनेने द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. आता उपराष्‍ट्रपतीपदासाठी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान आले आहे.

एकनाथ शिंदे गटाने बंड केल्याने शिवसेनेचे आमदार फुटले. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी सर्व विरोधी पक्षांना यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. तर शिवसेनेच्या खासदाराने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून द्रौपती मुर्मू यांना मतदान करण्यास सांगितले होते.

खासदाराने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत सर्वांना द्रौपती मुर्मू यांना मतदान करण्यास सांगावे, असे म्हटले होते. यामुळे सर्वांच्या नजरा शिवसेनेच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या खासदाराची भेट घेतली होती. यानंतर शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपती मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मुर्मू यांना विजय होणार असल्याचे मानले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या