19.5 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रस्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

स्थगिती उठविण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम; अंतिम सुनावणी २५ जानेवारीपासून

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून आणखी एक धक्का मिळाला असून, मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवत २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती दिल्याने नोकरभरती देखील रखडली होती. आज न्यायालयाने स्थगिती उठविण्यास नकार दिला आहे. त्यात स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीलाही परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मराठा आरक्षणावरुन हा मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकिलांनी विविध उदाहरणे देऊन मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली. पण सध्या या प्रकरणात कोणतीही सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला. मराठा आरक्षणाचे प्रकरण हे गंभीर आणि मोठें आहे. त्यामुळे याबाबत विस्तृत सुनावणीच केली जाईल, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले आहे.

कोणतीही भरती थांबविण्याचा आदेश नाही
मराठा आरक्षणावरील स्थगितीमुळे विद्यार्थ्यांचे आणि नोकर भरतीबाबत होत असलेल्या नुकसानीचा विषय अ‍ॅड. मुकूल रोहतगी यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने आम्ही कोणतीही भरती थांबविण्यात निकाल दिलेला नाही. पण मराठा आरक्षणानुसार ही भरती करता येणार नाही, असे म्हटले आहे.

हनुमान मंदिरासाठी मुस्लीम व्यक्तीने दान केली कोट्यवधींची जमीन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या