24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळे हात तोडण्याची भाषा करत आहेत : प्रवीण दरेकर

सुप्रिया सुळे हात तोडण्याची भाषा करत आहेत : प्रवीण दरेकर

एकमत ऑनलाईन

मुंबई : सरकार पुरस्कृत दंडेलशाहीला भाजप घाबरणार नसल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले. स्मृती इराणी यांच्या दौ-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे या हात तोडण्याची भाषा करत आहेत, पोलिसांनी याची चौकशी करून कारवाई केली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी वक्तव्ये कशी केली जाऊ शकतात. पोलिस या सगळ्याची चौकशी करून कारवाई करणार का? असा सवालही यावेळी दरेकर यांनी केला.

शरद पवारसाहेब यांनी संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ म्हटले होते, मग आता शिवसेना अशी भूमिका कशी घेऊ शकते.. शिवसेनेचे संभाजीराजे यांच्याबद्दलचे प्रेम दिसले असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांची महाविकास आघाडी फसवणूक करत असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपने याबाबत कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे ही भाजपची चाल आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नाहीत
रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. पवार साहेब किंवा दुसरे पवार आहेत त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांना सल्ला देऊ नये असेही ते म्हणाले. चंद्रकांतदादांनी हे सगळं करायला सांगितलं आहे का? मग टीका कशाला करता. रोहित पवार हे बुजुर्गपणाचा आव आणत आहेत, असेही दरेकर म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या