19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रसुरत-नाशिक-नगर-सोलापूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे होणार

सुरत-नाशिक-नगर-सोलापूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे होणार

एकमत ऑनलाईन

नगर : केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सुरत-नाशिक-नगर-सोलापूर ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेची घोषणा केली. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अहमदनगरमध्ये आज ४ हजार ७५ कोटींच्या २५ महामार्गाचे भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून राज्यातील ट्राफिक पूर्णपणे कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा गडकरी यांनी केला. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात हा एक्सप्रेस वे एक मैलाचा दगड ठरणार असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. या रस्त्याला पूर्ण ग्रीन अलाईन्मेंट आहे. हा रस्ता सूरत ते चेन्नई पर्यंत जाणार आहे. यात पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, गुजरात इथला सगळा ट्राफिक येतो मुंबईत. मुंबईवरुन सोलापूर, कोल्हापूरवरून तो दक्षिणेत जातो. त्यामुळे कोल्हापूरचेही ट्राफिक जाम कमी होईल, सोलापूरचाही कमी होईल आणि हा सगळा सूरतवरुन वळेल, असे गडकरी म्हणाले.

गडकरींनी स्वत: घेतली ट्रायल
हा रस्ता हा अ‍ॅक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे असणार आहे. परवा मी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस हायवेवर होतो. त्यावर मी जेव्हा ट्रायल घेतली तेव्हा गाडी १४० किमी प्रतितास गाडी चालली. नंतर १७० किमी प्रति तास वेगाने गाडी चालली तेव्हा पोटातले पाणीही हलले नाही. आपल्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पेक्षा रुंदीला तीन पट मोठा आहे. आता ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सगळा ट्राफिक आता सूरतवरुन वळेल, असे गडकरी म्हणाले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या