मुंबई : पायाचे दुखणे वाढल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या म्हणजेच ३१ मे रोजी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच १ जून रोजी त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या पायाचे दुखणे वाढल्याने ही शस्त्रक्रिया केली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी उद्या म्हणजेच ३१ मे रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्या केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले.