24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रसुशांतची आत्महत्याच

सुशांतची आत्महत्याच

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्याच केली असल्याचे आता समोर आले आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) च्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यासंबंधीचा माहिती दिली असून, यासंदर्भातील अंतिम अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) टीमकडे सोपविण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळे वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येवर शिक्कामोर्तब झाले आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून, हत्येचा दावा फेटाळला असल्याचे सांगितले. एम्स रुग्णालयाकडून सुशांतसिंहच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरू होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करून सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच, व्हिसेरा रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

तज्ज्ञांचे मत ग्राह्य धरले जाणार
एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करून पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ज्ञांचे मत म्हणून ग्रा धरले जाणार असून, त्यांना साक्षीदार म्हणूनही उभे केले जाऊ शकते.

सर्व बाजूंची पडताळणी करणार : सीबीआय
सुशांतसिंहचा १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले असले तरी ही हत्या असावी, असा संशय होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय या प्रकरणी तपास करत असून, आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जगातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे लोकार्पण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या