24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रशिर्डीत अवयव चोरी रॅकेटचा संशय

शिर्डीत अवयव चोरी रॅकेटचा संशय

एकमत ऑनलाईन

शिर्डी : मध्य प्रदेशमधील इंदोर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ताप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने शिर्डी पोलीस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. शिर्डीत गेल्या चार वर्षांत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

इंदूर येथील दीप्ती सोनी १० ऑगस्ट २०१७ ला शिर्डीतून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याने दीप्ती यांचे पती मनोज सोनी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. संपूर्ण तपासाचा अहवाल शिर्डी पोलिसांकडून औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर झाल्यानंतर २२० पानी अहवाल निरर्थक ठरवला आहे.

कोर्टाकडून दोन वेळा सूचना देऊनही तपास नाही
कोर्टाने यापूर्वी सलग दोनदा मानवी तस्करी किंवा अवयव चोरीच्या अंगाने तपास करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतरही तसा तपास केल्याचा चकार शब्दही अहवालात नाही. मात्र पोलिसांनी मानवी तस्करी याबाबत कोणतेही पुरावे अथवा तक्रार आजपर्यंत जिल्ह्यात दाखल नसून पुन्हा एकदा नव्याने या बेपत्ता प्रकरणी तपास सुरू केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी अतिशय निष्काळजीपणे या गंभीर प्रकरणाचा तपास केल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.

बेपत्तांमध्ये परराज्यातील महिला, मुली अधिक
शिर्डीत दररोज लाखो साईभक्त दर्शनासाठी येतात तसेच बेपत्ता होण्याचे प्रमाण सुद्धा बरेच असून बेपत्तांमध्ये विवाहित महिला व मुलींचे मोठे प्रमाण आहेत. हे बहुतेक सर्व महाराष्ट्राबाहेरील आहेत. दर्शनासाठी शिर्डीत आल्यानंतर बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र अनेकांचा शोध सुद्धा लागला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार हे पाहणे महत्वाचे आहे.

शिर्डीतून बेपत्ता व्यक्तींची आकडेवारी
२०१७- ७१ बेपत्ता- २० तपास बाकी
२०१८- ८२ बेपत्ता- १३ तपास बाकी
२०१९- ८८ बेपत्ता- १४ तपास बाकी
२०२०- ३८ बेपत्ता- २० तपास बाकी

लातूर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आमदार पाटील यांचे धरणे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या