24.7 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home मनोरंजन बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुझफ्फरपूर -बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत कलाकाराचे नाव अक्षत उत्कर्ष असून, तो मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत होता. नवोदित कलाकार असलेला अक्षत हा मुळचा बिहारमधील मुझफ्फरपूरमधील सिकंदरपूर येथील रहिवासी होता. दरम्यान, मृत अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

रविवारी रात्री ९ वाजता वडिलांशी बोलणे झाले

अक्षतचे मामा रंजित सिंह यांनी सांगितले की, रविवारी रात्री ९ वाजता अक्षतचे त्याच्या वडिलांशी बोलणे झाले. मात्र त्याच रात्री उशिरा त्याच्या मृत्यूची बातमी कळली. त्याबरोबरच मुंबई पोलीस हे या प्रकरणी सहकार्य करत नसल्याचा आरोप अक्षतच्या मामांनी केला आहे. अक्षत उत्कर्ष हा सिकंदरपूर येथील विजयंत चौधरी ऊर्फ राजू चौधरी यांचा पुत्र होता. त्याचा मृतदेह मुंबईहून पाटणा विमानतळावर आणण्यात आला आहे.

पोलिसांनी कुठल्याही प्रकारची एफआयआर नोंदवलेली नाही

अक्षतच्या मृत्यूप्रकऱणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारची एफआयआर नोंदवलेली नाही. तसेच या घटनेबाबत सध्यातरी अधिक माहितीची वाट पाहिली जात आहे. दरम्यान जूनमध्ये झालेल्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अद्याप तपास सुरूच आहे. तसेच दररोज नवनवे दावेही होत आहेत.

गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या