37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रमुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू ; प्रकरणाचे गूढ...

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू ; प्रकरणाचे गूढ वाढले

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.५ (प्रतिनिधी) उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या चोरीच्या वाहनात स्फोटके सापडली होती, गाडीच्या मूळ मालकाचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडल्याने खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत
हे सगळे प्रकरणच संशयास्पद असल्याचा आरोप करताना पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तपास अधिकारी सचिन वाझे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना, या प्रकरणाचा तपास केंद्राच्या एनआय कडे सोपवावा अशी मागणी फडणवीस यांनी विधानसभेत केली.

दोन आठवड्यांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या घरासमोरील रस्त्यावर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ कार सापडल्याने खळबळ उडाली होती. घटनास्थळी सापडलेली स्कॉर्पियो काही दिवसांपूर्वी ठाणे येथून चोरीला गेली होती. याप्रकरणाची चौकशी सुरू असतानाच आज अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन काल रात्रीपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी आज दुपारी नौपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

एनआयए कडे तपास द्या – फडणवीस
हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समोर येण्यापूर्वी आज विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण संशयास्पद असून त्याचा तपास एनआयएकडे द्यावा व हिरेन हे महत्वाचा दुवा असल्याने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली होती. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली जिलेटिनने भरलेली गाडी आणि संपूर्ण घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. त्यामुळे तपास एनआयएकडे सोपवणे आवश्यक आहे.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर रात्री एक वाजता गाडी पार्क झाली. तीन वाजता ड्रायव्हर मागच्या गाडीतून पळून गेला. या दोन्ही गाड्या ठाण्यातून आल्या होत्या. संशयास्पद गाडी आढळून आल्यानंतर सर्वप्रथम तेथे स्थानिक पोलीस नाही, तर मुंबई क्राईम ब्रँचचे सचिन वाझे तिथे पोहोचले. मग सचिन वाझे यांनाच तपास अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. याच सचिन माझे व स्कॉर्पिओचे मालक यांच्यात जून व जुलै महिन्यात फोनवर संवाद झाल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. दोघेही ठाण्यांतले. ते एकमेकांना ओळखतात. अंबानींच्या घरासमोर संशयास्पद गाडी दिसल्यावर तेथे पहिल्यांदा पोचणारेही वाझेच. धमकीचं पत्रही वाझेंनाच मिळाले. एवढे सगळे योगायोग शंकेला वाव देणारे आहेत. त्यामुळे या घटनेची चौकशी एनआयएकडे द्यावी, अशी माझी फडणवीस यांनी केली.

१ एप्रिलपासून प्रवासी वाहनांमध्ये फ्रंट एअरबॅग अनिवार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या