दारू खरेदी करण्यासाठी आणखी पैसे नसल्यामुळे सॅनिटायझर प्राशन केलं
नागपूर : सॅनिटायझर प्यायल्याने नागपूरात एका पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दररोज दारू पिण्याची सवय असलेल्या महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याने दारू न मिळाल्याने घरातील सॅनिटायझर प्राशन केले. यामुळे प्रकृती खराब होऊन त्याचा मृत्यू झाला.
दारूचे प्रचंड व्यसन होतं
गौतम गोस्वामी नागपूर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी होते. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होतं. 21 जून रोजी घरी असताना पुरेशी दारू न मिळाल्यामुळे आणि दारू खरेदी करण्यासाठी आणखी पैसे नसल्यामुळे गौतम यांनी कुटुंबीयांचे लक्ष नसताना घरातील सॅनिटायझरच्या बॉटल मधून सॅनिटायझर प्राशन केलं.
तब्येत बिघडली
त्यानंतर संध्याकाळी त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. आठ त्यांच्यावर उपचार झाले. पण, रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. गौतम हे महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. नागपूरात ते पत्नी आणि मुलासह राहात होते. त्यांना दारूचं व्यसन होतं. पण, टाळेबंदीमध्ये त्यांना दारू मिळत नव्हती.
Read More लातूर : सावधान कोरोना वेगाने पसरतोय, जिल्ह्यात आज २२ रुग्ण पॉजिटीव्ह