26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईत कोरोनासोबत वाढतोय ‘स्वाईन फ्लू’

मुंबईत कोरोनासोबत वाढतोय ‘स्वाईन फ्लू’

एकमत ऑनलाईन

मुंबई : सध्या राज्यात आणि देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना डेंग्यू आणि चिकनगुण्याचे सुद्धा सक्रिय रुग्ण राज्यात आढळून येत आहेत. त्याचबरोबर आता मुंबईत स्वाईन फ्लूने सुद्धा डोके वर काढले असून शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

आतापर्यंच मुंबईत ११ रुग्णांची नोंद झाली असून पावसाळ्यात अशा साथीच्या रोगांचा संसर्ग जास्त प्रमाणात पसरतो यासाठी डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यात सध्या पावसाळ्यामुळे सर्दी, खोकला, ताप, मलेरिया यांसारख्या आजारांसहित स्वाईन फ्लूचा धोका वाढत आहे असे मत डॉक्टरांनी नोंदवले आहे. मुंबईत सध्या स्वाईन फ्लूचे चार रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे लोकांनी ‘एन्फ्लूएन्झा एच-१ एन-१’ ची चाचणी करावी असे आवाहन केले गेले आहे.

मागच्या तीन वर्षांत एच-१एन-१ च्या एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नव्हती. त्यानंतर मागच्या दोन वर्षांत जवळपास १०८ रुग्णांची नोंद झाली होती. तर मागच्या आठवड्यात स्वाईन फ्लूच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या