24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्र  नुपूर शर्मा यांच्यावर अटकेची टांगती तलवार

  नुपूर शर्मा यांच्यावर अटकेची टांगती तलवार

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे निलंबन केले आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपने त्यांची हकालपट्टी केली आहे. त्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. मुंबई पोलिसांकडून आता नुपूर शर्मा यांना समन्स बजावण्यात येणार आहे. नुपूर शर्मा यांच्या विरोधात रझा अकादमीने एफआयआर दाखल केला आहे. मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला.

एमआयएमचे नेते ओवेसी, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि मुस्लिम समाजाशी संबंधित संघटनांनी नुपूर शर्मा यांच्या अटकेची मागणी केली आहे. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाईची तयारीही सुरू झाली आहे. मुंबई पोलिस लवकरच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावणार आहेत. काही दिवसांपूर्वी रझा अकादमीने मुंबईतील पायधुनी पोलिस ठाण्यात नुपूर शर्माविरोधात गुन्हा दाखल केला होता.

धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप
नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप रझा अकादमीने तक्रारीत केला आहे. याशिवाय नुपूर यांच्याविरुद्ध ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्डानेही या मुद्यावर नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर या मुद्यावरून एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान सर्व स्तरांतून याला विरोध होत असतानाच साध्वी प्राची यांनी उघडपणे नुपूर यांचे समर्थन केले आहे.

काय वाद आहे?
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समाजातील लोक संतप्त झाले. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर नुपूर शर्मा यांनी म्हटले होते की, हा व्हीडीओ एडिट करण्यात आला आहे. हा व्हीडीओ समोर आल्यानंतर नुपूर शर्मा यांना इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून धमक्या मिळत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या