मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, शुभेच्छा देताना आव्हाड यांनी केलेले ट्विट सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरले आहे.
आव्हाड यांनी अण्णा हजारे यांना शुभेच्छा देताना सैन्य भरती प्रकरणी आशा व्यक्त केली आहे.
प्रिय अण्णा….. आपण लष्करातील माजी सैनिक आहात त्यामुळे भयंकर महागाई, वाढती बेरोजगारी, सामाजिक तेढ, ढासळती आर्थिक पत यावर तर सोडाच परंतु आता लष्करात देखील कंत्राटी पद्धतीने सैनिक भरती करणार आहेत त्यावर तरी किमान वाढदिवसाच्या निमित्ताने बोलाल याच आशेसह आपणांस हार्दिक शुभेच्छा! असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.