30.8 C
Latur
Friday, March 5, 2021
Home महाराष्ट्र आमदार निवास येथे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; आपल्या मागणीवर ठाम

आमदार निवास येथे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न; आपल्या मागणीवर ठाम

एकमत ऑनलाईन

मुंबई – आमदार निवास येथे एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पथक दाखल झाले असून गजानन खैरे नावाच्या शिक्षकाने वेतन मिळत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे दाखल झाले असून ते समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी लेखी आश्वासन देण्याचे देखील त्यांना आश्वासन दिले आहे. मात्र, शिक्षक आपल्या मागणीवर ठाम असून आताच अध्यादेश काढण्याचं शिक्षकाची अट आहे.

आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षक आत्महत्येचा प्रयत्न करत असून पोलीस आणि नाना पटोले देखील समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शिक्षक आपल्या मागणीवर ठाम आहे. गजानन खैरे मूळचे औरंगाबादचे आहेत. विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे यासाठी याआधी ही त्यांनी नाशिक ते विधानभवन मुंबई पायी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा त्यांना मध्येच थांबविण्यात आले आणि यावर उपसमिती स्थापन करून लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याचाच पाठपुरावा करण्यासाठी काही दिवसांपासून ते आमदार निवासात होते आणि अखेर आज त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला.

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,440FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या