नवी दिल्ली : शिवसेना पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर कोणाचा अधिकार आहे? याप्रकरणी आज (शुक्रवार, २० जानेवारी) केंद्रीय निवडणूक आयोगासमोर महत्वाची सुनावणी होणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपत आहे. त्यापूर्वी ठाकरे गटाने संघटनात्मक निवडणुका घेण्याची परवानगी मागितली आहे. याबाबत आज सुप्रीम कोर्ट महत्वाचा निर्णय देऊ शकते. तसेच शिवसेना पक्षाचे नाव चिन्हावर आज अंतिम निर्णय येईल की सुनावणी पुढे ढकलल्या जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी १७ जानेवारीला सुनावणी झाली होती. ठाकरे गटाच्या वतीने आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. तसेच शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी आपला निर्णय देऊ नये, असे आवाहन केले होते.
दरम्यान यावर काय निर्णय होणार हे पाहावे लागणार आहे. गेल्या सुनावणीत झालेला युक्तिवाद महत्वाचा होता. आज कोर्टाने निर्णय तर तो त्या सुनावणीवर अवलंबून राहील. त्यामुळे नेमका काय युक्तिवाद झाला हे समजून घेऊया…