30.2 C
Latur
Wednesday, March 3, 2021
Home महाराष्ट्र एकनाथ खडसेंना तात्पुरता दिलासा; सोमवारपर्यंत अटक नाही

एकनाथ खडसेंना तात्पुरता दिलासा; सोमवारपर्यंत अटक नाही

एकमत ऑनलाईन

मुंंबई : फडणवीस सरकारच्या काळात पुण्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीमुळे वादात सापडलेले राष्टÑवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना इडीने तात्पुरता दिलासा दिला आहे. भोसरीतील भुखंड घोटाळाप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारतील महसुलमंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. कालांतराने त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होऊन त्यांना क्लीन चिटही दिली होती. दरम्यान राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर भाजप सोडून महाविकास आघाडीत गेलेल्या एकनाथ खडसेंविरोधात भाजपच्या केंद्रसरकारच्या अखत्यारीत असलेल्या इडीने पुन्हा चौकशीसाठी सुरुवात केली आहे.

चौकशीसाठी खडसे यांना समन्सही बोलावले होते. त्यानंतर इडीने त्यांची तब्बल साडेसहा तास चौकशी केली होती. मात्र त्यानंतर इडीने कुठलीही कठोर कारवाई करू नये म्हणून खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. इडीनेही प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांच्या याचिकेला उत्तर दिले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती संभाजी श्ािंदे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली.

खडसे हे तपासात सहकार्य करत असतील आणि चौकशीच्या समन्सचे पालन करत असतील तर त्यांना अंतरिम दिलासा का देऊ नये? त्यांना काही दिवसांसाठी संरक्षण दिले तर आभाळ कोसळणार आहे का? अशी विचारणा न्यायमूर्ती संभाजी श्ािंदे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने इडीला केली. त्यानंतर इडीने सोमवारपर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याची हमी दिली. या हमीची न्यायालयाने नोंद घेतली आहे. खडसे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

 

आधार विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या