28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रडबेवाल्यांचाही ठाकरेंना पाठिंबा

डबेवाल्यांचाही ठाकरेंना पाठिंबा

एकमत ऑनलाईन

मुंबई : आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. मुंबईतील डब्बावाल्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांना विविध स्तरातून पाठिंबा जाहीर होत आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत आम्ही तुमच्या पाठिशी असल्याचे आश्वासनही मुंबई डब्बेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी उद्धव ठाकरेंना दिले. याआधी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची भेट घेत अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. सीपीआयच्या नेत्यांनी सांगितले की, ते भाजपविरुद्धच्या लढाईत एमव्हीएच्या पाठीशी उभे राहतील. याआधी काँग्रेस नेते नाना पटोले, अमित देशमुख आणि भाई जगताप यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला होता.

एकंदरीतच उद्धव ठाकरे गटाला पोटनिवडणुकीसाठी मोठा पाठिंबा मिळत आहे, तर भाजप आणि एकनाथ शिंदे गटात उमेदवारीवरून खलबतं सुरू आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांना डब्बेवाला संघटनेचा मिळालेला पाठिंबा शिंदे गटासाठी धक्का मानला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या