23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसंवादनंतर ठाकरेंची महाप्रबोधन यात्रा

शिवसंवादनंतर ठाकरेंची महाप्रबोधन यात्रा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेने राज्यभरात महाप्रबोधन यात्रेची घोषणा केली आहे. राज्यभरात शिंदे गट आणि शिवसेना असे विखुरलेल्या शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी या यात्रेचे आयोजन केले असून बंडखोरीचे जनक एकनाथ शिंदे यांच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेने या यात्रेला सुरुवात होणार आहे.

ठाण्यातील टेंभी नाक्यावर उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असून तेथील भाषणाने महाप्रबोधन यात्रेचे सुरूवात होणार आहे. तसेच महाप्रबोधन यात्रेची सांगताही उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेने होणार आहे. या यात्रेची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेने होणार आहे. गणपती उत्सवानंतर या यात्रेला सुरूवात होणार आहे.

दरम्यान, शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यावर शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली होती. यामध्ये त्यांनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या होत्या. ही शिवसंवाद यात्रा अजूनही सुरू असून या यात्रेला शिवसैनिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून महाप्रबोधन यात्रेची घोषणा करण्यात आली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या