30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे यांचा जनाब असा उल्लेख

बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब असा उल्लेख

एकमत ऑनलाईन

मुंबई: शिवसेनेच्या वडाळा शाखेने नववर्षानिमित्त ऊर्दू भाषेतील कॅलेंडर काढले आहे. कॅलेंडरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाआधी जनाब असा उल्लेख केला आहे. मात्र शिवसेनेचा सध्या हाडवैरी बनलेल्या भाजपने यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार व प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे कॅलेंडर शेअर केले आहे. कॅलेंडरमध्ये काही मोजके मराठी शब्द वगळता इतर मजकूर ऊर्दू व इंग्रजी भाषेत आहे. त्यात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे जनाब असे लिहिले आहे. या उल्लेखांवरून भातखळकर यांनी टीका केली. महिन्याभरापूर्वी शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली होती. आता तर त्यांनी बाळासाहेबांच्या नावापुढील हिंदुहृदयसम्राट हे बिरुद देखील काढून टाकले आहे.

तारखा, चंद्रोदय, सूर्योदय मुस्लिम कॅलेंडरनुसार दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी शिवाजी जयंती असा एकेरी उल्लेख करण्याचे धाडस केले,याचा आम्ही तीव्र निषेध करतो,असे भातखळकर यांनी म्हटले आहे. औरंगाबादचे संभाजीनगर सोडाच, पण मतांच्या लालसेपायी शिवसेनेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नामकरण जनाब बाळासाहेब ठाकरे असे करून दाखवले. शिवसेनाप्रमुखांना जनाब बाळासाहेब म्हणून शिवसेनेने वैचारिक सुंता करून घ्यावी, तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु अवघ्या देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची छत्रपती ही बिरुदावली काढणारे तुम्ही कोण? महाराष्ट्राची जनता तुमची खेटराने पूजा केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे. शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला आहे.

तीन महिन्यांचा पगार शहीदच्या कुटुंबाला; नवनीत राणांची घोषणा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या