24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा प्लॅन बी

दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा प्लॅन बी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिंदे गटाचा की शिवसेनाचा यावर अद्यापपर्यंत कोणताही निर्णय मुंबई महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे हे मैदान कुणाला मिळणार, याचा पेच कायम आहे. दुसरीकडे दोन्ही पक्षांकडून पर्यायी जागांचादेखील शोध घेतला जात आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर मेळावा घेता यावा, यासाठीही अर्ज करण्यात आला. या सर्वांमध्ये कोठेच परवानगी न मिळाल्यास उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंची आयडिया वापरून यंदाचा दसरा मेळावा गाजवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

खरी शिवसेना कोणाची, हा वाद सुप्रीम कोर्टात आहे. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिवाजी पार्क राखीव ठेवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, शिवसैनिकांना शिवाजी पार्कवर एकत्र जमा असे आदेश खुद्द उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेदेखील बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्या मेळाव्यात रिक्षावर उभारून भाषण केले, तीच पद्धत वापरली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या