26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रधनुष्यबाणासाठी लढाई!

धनुष्यबाणासाठी लढाई!

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेनेचे पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेत कॅव्हेट दाखल केले आहे.

भाजपसोबत जात एकनाथ शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन केली. यानंतर आता शिंदे गट शिवसेनेच्या पक्ष चिन्हावर दावा सांगण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आपली बाजू ऐकल्याशिवाय धनुष्यबाण या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या