29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपकडून 'धन्यवाद मोदीजी' मोहीम!

भाजपकडून ‘धन्यवाद मोदीजी’ मोहीम!

एकमत ऑनलाईन

मुंबई : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपकडून ‘धन्यवाद मोदीजी’ मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या नावे भाजप केंद्राला पत्र पाठवणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने मिशन-४५ ची घोषणा भाजपने केली आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती. दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत.

त्यापैकी ४५ जागा जिंकण्यासाठी भाजपने दंड थोपटले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना राबवण्यात येणार आहे. केंद्राच्या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या नावाने मोदीजींना पत्र पाठवण्यात येणार आहे. तर या मोहिमेमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार का हे पाहावे लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या