23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रशिवसैनिकांचे आंदोलन सुरूच

शिवसैनिकांचे आंदोलन सुरूच

एकमत ऑनलाईन

मुंबई : बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून, सोमवारीही शिवसैनिकांनी बंडखोरांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करून निषेध नोंदविला. आज गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसेच पुण्यात बंडखोर आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ््यांंची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना आव्हान दिले आहे. मुंबईत यावे आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगावे की आमचे काय चुकले. दगाबाजी करणारे, पळून जाणारे ंिजकत नसतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मुंबईत विकास विषयक कामांच्या शुभारंभावेळी माध्यमांनी त्यांना गाठत सद्यस्थितीवर प्रश्न विचारले त्यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले.

कोल्हापूरमध्ये राजकीय संघर्ष विकोपाला गेला आहे. शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिंदे गटाला समर्थन देत बंडखोरी केल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कट्टर शिवसैनिक विरुद्ध बंडखोर असे आंदोलन सुरू आहे. शिवसैनिकांनी कोल्हापूरमध्ये तर बंडखोरीच्या समर्थनार्थ जयंिसगपूरमध्ये आंदोलन झाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या