26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर; शरद पवार

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर; शरद पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ चालू झाला आहे. दरम्यान याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरुप गंभीर असून पक्ष म्हणून विचार करावा लागेल, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. भारतीय जनता पक्षाने मुंडेंवरील आरोपाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसलाच घेरले आहे. तर, मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरु लागली आहे. दरम्यान शरद पवार यांनीही मत मांडले आहे.

धनंजय मुंडे यांनी मला भेटून सदर प्रकरणाबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकरणात त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले होतील यांचा अंदाज त्यांना होताच म्हणून ते याविरोधात हायकोर्टात गेले. त्यांनी आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे त्याच्यावर आणखी भाष्य करण्याची गरज नाही, असे पवारांनी म्हटले आहे. मात्र माझ्या मते आरोपांचे स्वरुप गंभीर आहे. यावर पक्ष म्हणून विचार करावा लागेल,असेही पवार म्हणाले. मात्र पक्षातील सर्व सहका-यांशी बोलून पक्ष म्हणून निर्णय घेऊ. याला जास्त वेळ लागेल, असे वाटत नाही, असेही पवार यांनी सांगितले.

मलिकांवर व्यक्तिगत आरोप नाही
नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्जप्रकरणी झालेल्या अटकेबाबत विचारले असता पवार यांनी मलिक यांच्यावर व्यक्तिगत आरोप नाहीत, आरोप त्यांच्या जावयांवर आहे. अटकही झाली असून तपास यंत्रणेला सहकार्य करणे आणि वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे, असे सांगितले आहे. आहे.

शरद पवार योग्य निर्णय घेतील : मुंडे
शरद पवार यांच्या या सुरावरुन पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले मत मांडले आहे. मी स्वत: शरद पवारांना भेटून स्पष्टीकरण दिले आहे. राजीनाम्याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील आणि त्याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

डब्ल्यूएचओने तिस-यांदा चूक केलीत; आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारताने ठणकावले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या