24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार गंभीर नाही, आरक्षण देण्याची त्यांची इच्छाच नाही !...

मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार गंभीर नाही, आरक्षण देण्याची त्यांची इच्छाच नाही ! -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२७ (प्रतिनिधी)राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाहीय व हे आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींमुळे दिसले, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केला. राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळे केवळ मराठा समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला गेला आहे, अशी टीका त्यांनी केली.

मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा विषय आला तेव्हा सरकारचे वकील वेळेवर कोर्टात हजर राहिले नाहीत. त्याबद्दल न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली. नंतर न्यायालयाने सुनावणी घेतली त्यावेळी सरकारच्या बाजूच्या दोन वकिलांमध्ये मतभेद दिसले. खटल्याच्या तयारीसाठी सरकारने पुरेसे प्रयत्न केले नाहीत. हे चिंताजनक आहे. या विषयामध्ये सरकार गंभीर नाही. हा प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात विरोधी पक्षांना सहभागी करून घेतले जात नाही. परिणामी मराठा समाज अनिश्चिततेच्या वातावरणातून जात आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात अनिश्चिततेचे वातावरण आहे. शैक्षणिक क्षेत्रात व नोकऱ्यांच्या क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. भीतीचे व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अकरावीचे तसेच मेडिकलचे प्रवेश थांबले आहेत. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

भाजपच्या सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेल्यानंतर एक वर्षे आम्ही तेथे लढा दिला आणि मराठा आरक्षणाला स्थगिती दिली जाणार नाही, याची खबरदारी घेतली. पण महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले. मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठीही ते गंभीर प्रयत्न करत नाहीत. सरकारने या क्षेत्रातील तज्ञांशी सविस्तर चर्चा करून मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमक्या कोणत्या दिशेने जायचे आहे हे ठरवावे. परंतु तसे होत नसल्याने या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेय की नाही, त्या आरक्षणाला आलेली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठवायची की नाही, असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

प्रत्येक साधुंची समाधी अशक्य : खा.साक्षी महाराज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या