24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रआघाडी सरकार पाच वर्ष तर टिकेलच, पण पुढच्या निवडणुकीतही एकत्र लढू

आघाडी सरकार पाच वर्ष तर टिकेलच, पण पुढच्या निवडणुकीतही एकत्र लढू

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१० (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर तर्क-वितर्कांना उत आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडी सरकार तर पाच वर्षे टिकेलच, पण पुढच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही आम्ही चांगली कामगिरी करू, असा विश्वास आज व्यक्त केला. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे, अशी प्रशंसाही त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वा वर्धापन दिन गुरुवारी पक्षाच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयात पार पडला. वर्धापन दिन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनिल तटकरे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आघाडी सरकार स्थिर असल्याचा निर्वाळा दिला. हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतेच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचे काम करेल याबाबत शंका नाही असे शरद पवार यांनी स्‍पष्‍ट केले.

आपण राज्याला वेगळ्या विचारांचे सरकार दिले. शिवसेना आणि आपण एकत्र काम करु शकतो असे कोणला पटले नसते. पण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज आघाडी सरकार चांगल्या रितीने काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांची स्वतंत्र चर्चा झाली असे सांगत लगेच वेगवेगळ्या वावड्या उठवण्यात आल्या. शिवसेनेसोबत आपण कधी काम केले नाही, पण महाराष्ट्र शिवसेनेलासुद्धा कित्येक वर्षांपासून पाहतो आहे. शिवसेना हा विश्वासू पक्ष आहे. देशात जनता पक्षाचं राज्य आले तेव्हा त्यानंतरच्या निवडणुकीत सगळीकडे काँग्रेसचा पराभव झाला होता. त्या काळात काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला, व तो पक्ष तो म्हणजे शिवसेना. केवळ पुढे आले नाहीत तर इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. कोण काय म्हणतो याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द पाळला. शिवेसनेने ज्या पद्दतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली तीच भूमिका सोडण्यासंबंधी कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीची दमदार वाटचाल
देशात अनेकांनी अनेक पक्ष काढले. १९७७ मध्ये जनता पार्टीचा प्रयोग झाला पण दोन वर्षात तो प्रयोग संपला. अनेक पक्ष आले. काही टिकले, काही काळाच्या ओघात संपले. पण राष्ट्रवादीनं २२ वर्ष पूर्ण केली आहेत. जनतेशी बांधिलकी व सहकाऱ्यांच्या परिश्रमामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. काही लोक पक्ष सोडून गेले पण त्यामुळे नवीन नेतृत्व तयार झाले. मंत्रीमंळातील अनेक जण नवी जबाबादारी पार पडण्यात यशस्वी होत आहेत, असे सांगत पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची प्रशंसा केली.

सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते
मराठा आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांतील इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण हे प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. सत्ता एकाच ठिकाणी राहिली की भ्रष्ट होते. सत्ता भ्रष्ट व्हायची नसेल तर अधिकांच्या हाती गेली पाहिजे. समाजातील प्रत्येत घटकाला आपण सत्तेचे वाटेकरी आहोत असे वाटले पाहिजे, असा सल्ला शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

दूध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या