22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeमहाराष्ट्र‘आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्र.. आता शेलार बोलले ; बॉलिवुड...

‘आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्र.. आता शेलार बोलले ; बॉलिवुड प्रकरणवरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा

एकमत ऑनलाईन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रोज कोणीना कोणी टीका करायची असा ठराव झाल्यासारखे भाजपाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवरुन दिसून येत आहे. राज्यपालांचे लेटरवॉर नुकतेच रंगले होते.आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. राज्यात सध्या परतीच्या पावासने थैमान घातले असून शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट असे उपहासात्मक ट्विट केले आहे. नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेत अशी टीका त्यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट. महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोनासोबत पावसाने थैमान घातलेले. शेती, घरे, गुरे, सारे काही उद्ध्वस्त..शेतकºयांच्या डोळ्यारतून अश्रूंचा पूर अनावर. तेव्हा नगराचे राजे ‘‘बॉलिवूड’’ कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले’.

‘मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय. त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री ११.३० पर्यंत खुले ठेवून नाईटलाईफची काळजी राजपुत्र करत आहेत. दुर्दैवी चित्र..महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा!,’’ असंही ते म्हणाले आहेत. शेलारांच्या या ट्वीटवरुन नवीन वाद सुरु होण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद कोरोनाबाधित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या