29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार ! -नाना पटोले

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार ! -नाना पटोले

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवणार, असा निर्धार व्यक्त करतानाच, विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट केले. एक काळ होता अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना वागायला लावतात अशी चर्चा होती. पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलीत करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करताना अंडरवर्ल्ड प्रमाणे वागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी आध्यक्ष एकनाथराव गायकवाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत १२ तारखेला होणा-या पदग्रहण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ७० दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतक-यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरूद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतक-यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ असे सांगून पटोले यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलले ही नवीन बातमी आहे. पंतप्रधान झाल्यापासून ते संसदेऐवजी निवडणूक प्रचारांच्या सभांमध्येच अधिक बोलतात, असा टोला पटोले यांनी मारला. एक काळ होता अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना हवे तसे वागायला लावतात अशी चर्चा होती. पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलीत करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करत आहे. सरकारही अंडरवर्ल्ड प्रमाणे वागत आहे हे गंभीर आहे, अशी टीका त्यांनी केली. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसकडेच राहिल काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करायचे याचा निर्णय घेतील असे नाना पटोले म्हणाले.

बहुगुणी ऑलिव्ह फळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या