25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeमहाराष्ट्रआईच्या मृतदेहाजवळ दोन दिवस बाळ उपाशीपोटी; महिला पोलिसांनी दाखवली माणुसकी

आईच्या मृतदेहाजवळ दोन दिवस बाळ उपाशीपोटी; महिला पोलिसांनी दाखवली माणुसकी

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात डोळ्याच्या कडा ओल्या करणारी घटना समोर आली आहे. येथे कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह दोन दिवस घरातच पडून होता. त्या महिलेच्या मृतदेहाजवळ एक वर्षाचे बाळ उपाशीपोटी रडत होते. मात्र कोरोनाच्या भीतीने कोणी त्या बाळाला हात लावला ना त्या महिलेच्या मृतदेहाला. अखेर दोन महिला पोलिस हवालदारांनी मातृत्व दाखवत त्या बाळाला जवळ घेतले आणि आपल्याबरोबर नेले.

ही घटना पिंपरी-चिंचवड परिसरातील असून त्या मयत महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजा-यांना तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. मात्र कोरोनाच्या भीतीने कोणी तिच्या घराजवळ गेले नाही. संतापजनक बाब म्हणजे लोकांचे हृदय त्या रडणा-या बाळाकडे पाहूनही वितळले नाही. या घटनेची माहिती जेव्हा हवालदार सुशीला गभले आणि रेखा वाजे यांना कळाली तेव्हा त्यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील त्या घराकडे धाव घेतली.

त्यांनी घराचे कुलूप तोडले. आतील चित्र पाहून त्याही स्तब्ध झाल्या. एक वर्षाचे बाळ आपल्या आईच्या मृतदेहाजवळ उपाशीपोटी रडून रडून निपचित पडले होते. त्यावेळी त्या दोन महिला पोलिस हवालदारांनी मातृत्व दाखवत त्याला जवळ घेतले आणि बिस्किट-दूध भरवले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले.

चाईल्ड केअरमध्ये बाळाला केले भरती
मातृत्व दाखवणा-या त्या दोन्ही महिला हवालदार या दिघी येथे कर्तव्यावर होत्या. त्यांनी त्या बाळाला जवळ घेत त्याला भरविल्यावर त्याला रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली जी निगेटिव्ह आली. त्यानंतर दिघीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी बाल कल्याण समितीच्या सूचनेनुसार, त्या बाळाला चाईल्ड केअरमध्ये भरती केल्याचे सांगितले.

रूग्णसंख्येत घट: जिल्ह्यात केवळ ५१८ नव्या बाधितांची नोंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या