24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील; महाडिक

राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील; महाडिक

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून काल उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच, भाजपकडून तिस-या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

उमेदवारी जाहीर होताच धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, राज्यसभेवर तिसरी जागा भाजपची असणार आहे. यासाठी आम्हाला १० मतांची आवश्यकता असून त्याची व्यवस्था आम्ही केली आहे. भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये सध्या नाराजी पहायला मिळत आहे. त्यामुळं याचा फायदा आम्हाला निश्चित होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होणार नाहीय. तसंच काँग्रेसच्या नाराजीचा फायदाही आम्हाला होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. शिवसेना, काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. त्यानंतर भाजपकडून काल दोन यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर तिस-या जाागेचा सस्पेन्स कायम होता. अखेरीस तिसरी जागा लढवणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. तिस-या जागेसाठी कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या