24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रकिनापट्टीवरील बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची

किनापट्टीवरील बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची

एकमत ऑनलाईन

मुंबई : कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या बोटींमध्ये तीन एके-४७ रायफल्स आणि अ‍ॅम्युनिशन आढळून आले आहे. ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असून बोटचे इंजिनात बिघाड झाल्याने ही बोट भरकटली आणि भारताच्या समुद्र किना-यावर आली. प्रथमदर्शनी यामध्ये कुठलेही दहशतवादी लिंक दिसून आलेली नाही. याचा तपास सुरु असून सर्वत्र अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

फडणवीस म्हणाले, याबाबत कोस्टगार्ड आणि इतर यंत्रणांना तात्काळ याची माहिती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या बोटीचे नाव लेडी हान असे असून या बोटीची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लॉन्डर्सगन या महिलेची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे या बोटीचे कप्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. २६ जून २०२२ रोजी सकाळी १० च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले. त्यानंतर यावरील खालाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्यानंतर १३ वाजताच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेनं बोटीवरील खलाशांची सुटका केली आणि त्यांना ओमानकडे सुपूर्द केले. पण समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीला टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे ही बोट भरकट भारतीय किना-याला लागली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या