26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

एकमत ऑनलाईन

मुंबई : अखेर राज्यातील विविध ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या १३ ऑक्टोबर रोजी १८ जिल्ह्यातील १,१६६ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या या कार्यक्रमानंतर संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली असून १४ ऑक्टोबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही घोषणा केली आहे. यंदा थेट जनतेतून संरपंच निवडला जाणार असल्याने सर्वांचेच लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे.

जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १३ सप्टेंबर २०२२ रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. त्यानंतर नामनिर्देशनपत्र २१ ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करता येणार आहेत. दाखल करण्यात आलेल्याना मनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ केली जाणार असून, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असणार आहे. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुकांसाठी मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असणार आहे. नक्षलग्रस्त भागासाठी हा वेळ दुपारी ३ वाजेपर्यंतच असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

कुठे किती जागांसाठी होणार निवडणुका?
ठाणे – कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, शहापूर- ७९. पालघर: डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११, वाडा- ७०. रायगड अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३, श्रीवर्धन- १. रत्नागिरी : मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३ रत्नागिरी- ४, लांजा- १५, राजापूर- १०

सिंधुदुर्ग – दोडामार्ग- २, देवडगड- २, नाशिक – इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ , पेठ- ७१, नंदुरबार – अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५, नवापूर- ८१, पुणे – मुळशी- १, मावळ-१

सातारा – जावळी- ५, पाटण- ५, महाबळेश्वर- ६, कोल्हापूर – भुदरगड- १, राधानगरी- १, आजरा-१, चंदगड – १, अमरावती – चिखलदरा- १, वाशीम- १, नागपूर – रामटेक ३, भिवापूर ६, कुही – ८. वर्धा २, आर्वी- ७

चंद्रपूर – भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३०, ब्रह्मपुरी- १, भंडारा – तुमसर- १, भंडारा- १६, पवणी २ , साकोली- १, गोंदिया – देवरी-१, गोरेगाव- १, गोंदिया- १, सडक अर्जुनी- १, अर्जुनी मोर- २

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या