33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home महाराष्ट्र महाडमध्ये इमारत पत्या सारखी कोसळली; ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती

महाडमध्ये इमारत पत्या सारखी कोसळली; ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती

एकमत ऑनलाईन

रायगड( प्रतिनिधी) – निसर्ग वादळातून बाहेर पडतानाच आता रायगड जिल्हा आज इमारत दुर्घटनेत हादरला आहे. महाडमधील साळीवाडा नाका काजळपुरा भागात एक रहिवासी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

इमारत कोसळल्याने ढिगा-याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले आहे.

ढिगा-याखालून २५ जणांना बाहेर काढण्यात आले
प्राथमिक माहितीनुसार या इमारतीत ४० कुटुंब राहत होते आणि ढिगा-याखाली ७० ते ८० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ढिगा-याखालून ६ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान पुण्यातून एनडीआरएफच्या तीन टीम महाड कडे रवाना झाले आहेत ढिगा-याखालून २५ जणांना बाहेर काढण्यात आले आहे

पाच मजली असलेली ही इमारत दहा ते बारा वर्षे जुनी
इमारतीत एकूण ४७ फ्लॅट असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे एनडीआरएफच्या तीन टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाडमधील काजळपुरा परिसरात होती. पाच मजली असलेली ही इमारत दहा ते बारा वर्षे जुनी असल्याचं बोललं जात आहे.

पत्त्यांसारखी इमारत कोसळली
सायंकाळच्या सुमारास पत्त्यांसारखी ही इमारत कोसळली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मात्र, रात्र झाल्याने बचावकार्यात थोडा अडथळा येत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटलं की, महाडमध्ये कोसळलेली ही इमारत पाच मजली होती आणि फार जुनी नव्हती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

माय-लेकाचा जिव वाचला : खाकी वर्दीतही माणूसकीचे दर्शन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या