मुंबई : मशिदीवरील भोंग्यांचा विषय थंड होत असल्याचे चित्र असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा या विषयाला हवा दिली आहे. त्यांनी आज एक पत्र ट्विट करत मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मशिदीवरील भोंग्याचा एकदा निकाल लावायचा, कामाला लागा, भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाबाबत आपली आक्रमक भूमिका पुन्हा स्पष्ट केली. त्यामुळे भोंग्याचा वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.