26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रमहिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक

महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यात झालेल्या या सत्तापालटाचा परिणाम राज्य महिला आयोगावरही होणार असल्याची चर्चा रंगत असून या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे पद जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. हे पद स्वीकारण्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद सोडले होते. त्यामुळे आता नवीन सरकार आले असले तरी हे पद सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी चाकणकर या राजीनामा देण्याच्या तयारीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांचे नियमित दौरे अजूनही सुरू आहेत. नुकतीच त्यांनी नाशिक येथील पोलिस आयुक्त कार्यालयाला भेट दिली आणि पोलिस आयुक्तांसोबत कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, बालविवाह या व महिलांसंबंधी असलेल्या इतर विविध प्रकरणांबाबतीत आढावा बैठक घेतली.

रुपाली चाकणकर यांनी आपण महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारकडून चाकणकर यांना पदावरून खाली खेचण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या