22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी सोपविला लेकाकडे कारभार

मुख्यमंत्र्यांनी सोपविला लेकाकडे कारभार

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये श्रीकांत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंंच्या खुर्चीवर बसले असल्याचे दिसत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रविकांत वरपे यांनी याबद्दलचे ट्विट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये वरपे म्हणतात की, खासदार श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?

वरपे यांनीच श्रीकांत शिंदेंचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. त्यावरुन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवतायत असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. मुख्यमंत्री बुधवारी दिल्ली दौ-यावर गेले होते. अचानक शिंदेंनी आपला दौरा लांबवला आणि गुरुवारचा संपूर्ण दिवसही त्यांनी दिल्लीतच घालवला. रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

सावळा गोंधळ सुरू : वरपे
मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतात, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या रविकांत वरपे यांनी केला आहे. रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो समोर आणला आहे. त्या फोटोमध्ये श्रीकांत शिंदे ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार करत असल्याचा आरोप रविकांत वरपे यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या