25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांची काळजी वाटते

मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते

एकमत ऑनलाईन

पुणे : पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात सुप्रिया सुळे बोलत होत्या. राज्य सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, नवीन सरकार गोंधळलेले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान होत आहे आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे बिचारे मुख्यमंत्री, त्यांच्या मागे खूप मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते. विरोधकांकडून सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नसणे, विविध निर्णय, यासोबतच आता देवेंद्र फडणवीसांच्या कृतीचीही चर्चा होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील घडामोडींवर केली चिंता व्यक्त
राज्यातल्या राजकारणाबद्दलही सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वत:च गोंधळात आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे. ते महाराष्ट्राला न शोभणारे आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खूप काळजी वाटते. त्यांना प्रॉम्प्टींग करणे, चिठ्ठी देणे अशा कृतीतून मुख्यमंत्र्यांना कमीपणा दाखवायचे काम उपमुख्यमंत्री करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या