21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रजखमी वारक-यांच्या मदतीसाठी धावून आले मुख्यमंत्री

जखमी वारक-यांच्या मदतीसाठी धावून आले मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : दोन दिवसांपूर्वी मिरज-पंढरपूर मार्गावर नागजजवळ पायी चालत जाणा-या दिंडीत एक चारचाकी वाहन घुसल्याने झालेल्या अपघातात १४ हून अधिक वारकरी जखमी झाले होते.

गंभीर जखमी झालेल्या वारक-यांना मिरजमधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान या सर्व वारक-यांच्या तब्येतीची आणि त्यांच्यावर केल्या जाणा-या उपचारांची स्वत: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेतली आहे.

सर्व वारक-यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.
तसेच ज्या वारक-यांना गंभीर दुखापत झाली आहे त्या वारक-यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली असून याबाबतची कल्पना मुख्यमंत्री शिंदे यांनी मिरजमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांच्याशी फोनवरून बोलताना दिली आहे.

आषाढी वारी अगदी ४ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना मिरज-पंढरपूर मार्गावर नागजजवळील केरेवाडी फाट्याजवळ आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील वारक-यांच्या दिंडीत जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ वारकरी जखमी झाले होते.

जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारक-यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या