22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री म्हणाले की, घाबरू नका.. काळजी घ्या

मुख्यमंत्री म्हणाले की, घाबरू नका.. काळजी घ्या

एकमत ऑनलाईन

नगर : शिवसेना पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शहरातील एका शिवसेनेच्या एका नेत्याच्या प्रकृतीची विचारपूस झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, घाबरू नका.. काळजी घ्या, शिवसेना व आम्ही आपल्या पाठीशी आहोत. तुमच्या प्रकृतीबाबत व इलाजबाबत कोणतीच तडजोड केली जाणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या एका नेत्यास दिलासा दिला.

करोनाबाबत संपूर्ण राज्याचा आढावा मुख्यमत्री घेत होते. त्यावेळी चर्चेत नगरचे नाव आले तेव्हा त्यांना नगर मधिल एका शिवसैनिकाला करोना झाल्याचे वृत्त समजले. त्यावेळी त्यांना रहावले नाही. त्यांनी लगेच शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर यांना नेत्याशी संपर्क साधण्याचे आदेश दिले.

नार्वेकर यांनी नगर शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख यांच्याशी मोबाईवरून संवाद साधला व माहिती घेतली. त्यावेळी उपजिल्हा प्रमुख हे एका खासगी हॉस्पिटल मधेच शिवसैनिका सोबत होते. त्यांनी तात्काळ फोन त्यांना दिला. मुख्यमंत्री यांनी प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Read More

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या