22.1 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री पूजेला गेले होते, हात दाखविण्याचा प्रकार झालेला नाही 

मुख्यमंत्री पूजेला गेले होते, हात दाखविण्याचा प्रकार झालेला नाही 

एकमत ऑनलाईन

नाशिक : मुख्यमंत्री पूजेला गेले होते होते हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डी दौ-यावर असताना अचानक त्यांनी ताफा सिन्नरकडे वळवला. त्यानंतर सिन्नरजवळील ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी भेट दिली. यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून अजित पवार , सुप्रिया सुळे यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी यावर बोलायला हवं, असे म्हटले आहे.

आज नाशिकमध्ये ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने दादा भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल शिर्डीला गेले होते. यावेळी त्यांनी सपत्नीक साई मंदिरात पाद्यपूजा केली. तसंच त्यांच्या हस्ते आरती देखील झाली. शिर्डीहून मुख्यमंत्र्यांचा ताफा अचानक सिन्नरकडे वळला.

सन्नर तालुक्यातील श्री ईशान्येश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. त्याचबरोबर सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. या भेटीनंतर चर्चाना उधाण आले आहे. यावर बोलताना मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री पूजेला गेले होते, हात दाखविण्याचा कुठलाही प्रकार झालेला नसल्याचे ते म्हणाले.

ते यावेळी म्हणाले कि, शिर्डीहून मुख्यमंत्री हे सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. या ठिकाणी पूजा केल्यानंतर ते माघारी फिरले. त्यामुळे हात दाखविण्याचा प्रकार झालेला नाही. त्यांनतर मालेगाव शहरात गोवराचे संशयित रुग्ण आढळले, यावर ते म्हणाले कि, मालेगावात काही लहान बालकांना गोवरचे डोस दिले नसल्याचं समोर आलं आहे.

या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्याचे आदेश दिले असून लसीकरण जनजागृती मोहिमेत काही धार्मिक गुरूंनाही सहभागी करून घेणार आहोत. तसेच त्र्यंबकेश्वर जवळील अंजनेरी येथील अधरतीर्थ आश्रमातील चार वर्षीय मुलाचा खून आल्याची घटना घटना घडली. या मुलाच्या झालेल्या हत्येच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे भुसेंनी सांगितले.

शिंदेचे सांगतील ज्योतिषाचे भविष्य
गुलाबराव पाटील
एकनाथ शिंदे हे स्वत:चे भविष्य तयार करणारा माणूस आहे, मुख्यमंत्र्यांना भविष्य पाहण्याची काहीच गरज नाही. ते भविष्यकाराचे भविष्य सांगतील. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मुख्यमंत्री तिकडे गेले असतील. एकनाथ शिंदे हे स्वत:चे भविष्य तयार करणारा माणूस आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे ते कोणालाही भविष्य दाखवणार नाही, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या