18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्र२० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार

२० ऑक्टोबरपासून कॉलेज सुरू होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू झाल्यानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. कोरोनामुळे दीर्घकाळापासून बंद असलेली महाविद्यालये आता २० ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. मात्र, यासाठी विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना काही नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. अर्थात, विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक करण्यात आले आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याविषयीची माहिती दिली.

राज्यातील कॉलेजेस २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मात्र, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणार आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, महाविद्यालये सुरू करण्यासाठी वेगवेगळ््या जिल्ह्यांत वेगवेगळी नियमावली असणार आहे. त्या-त्या जिल्ह्यांतील परिस्थिती पाहून हे ठरवले जाईल. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही किंवा एकच डोस झालेला आहे, त्यांच्यासाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हजर राहता येणार नाही, त्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय कॉलेजने करावी. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाविद्यालय सुरू ठेवायची का, हा निर्णय घेण्याचे अधिकार सर्वस्वी स्थानिक प्राधिकरणाला असतील. डोस पूर्ण झाले नसतील, तर महाविद्यालयांनी कॅम्प घेत लसीकरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वसतिगृहेसुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठांना देण्यात आले आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या