24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र देहव्यापार करणाऱ्या महिलांसाठी 'चिची हाऊस' ची संकल्पना

 देहव्यापार करणाऱ्या महिलांसाठी ‘चिची हाऊस’ ची संकल्पना

एकमत ऑनलाईन

मुंबई : देहव्यापार करणाऱ्या महिलांचे जीवन म्हणजे अंधकारमय, यातनादायी जीवन या नरकात कोणीही स्वखुशीने येत नसून त्या लोटल्या जात असताना त्यांना स्वलांबनाची शिकवण दिल्यावर त्यांच्या सुद्धा जीवनात आशेचा किरण चमकू लागला. त्यांनी या नरकयातना भोगण्याचे सोडून सर्वसामान्य जीवन जगण्याचा संकल्प केला असता त्यांना नुकताच एका संस्थेच्या माध्यमातून स्वतः च्या घरात सर्वसामान्य जीवन जगण्याची उमेद दिली.

भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील 500 हुन अधिक देहव्यापार करणाऱ्या महिलांमुळे बदनाम झालेली वस्ती. परंतु, या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून श्री साई सेवा संस्थेच्या स्वाती [सिंग] खान यांनी चार वर्षांपूर्वी सामाजिक आरोग्य विषयक कार्यास सुरुवात केली. या महिलांशी या काळात स्वाती खान यांचे स्नेहाचे संबंध निर्माण झाले.

मार्च महिन्यात देशभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर देशभरात लॉकडाऊन लागू झाला. या काळात असंख्य उद्योग व्यवसाय रोजगार बंद असतानाच स्वाती खान यांच्या नेतृत्वाखाली येथील महिलांनी कोरोनाचा संसर्ग टाळावा यासाठी आपले रोजगार असलेला देहव्यापार बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला.लॉकडाउन काळात संस्थेच्या माध्यमातून विविध समाजसेवी संस्थांनी या महिलांसाठी धान्य किराणा साहित्य आजपर्यंत पुरविले. परंतु, त्यांच्या पोटाची भूक भागवून स्वस्थ न बसता स्वाती खान यांनी या महिलांना काहीतरी रोजगार उपलब्ध करून देण्याचा चंग बांधला. येथील 25 महिलांनी अगरबत्ती पॅकिंग, दिवाळी शोभेची लायटिंग बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले.

हळूहळू या कामातून पैसे मिळायला लागल्याने देहव्यापार करून जीवन व्यतीत करणाऱ्या चार महिलांनी देहव्यापार बंद करून सर्वसामान्य महिलांचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्वाती खान यांनी या परिसरातील चार खोल्या भाड्याने घेऊन त्यास रंगरंगोटी करून नव्या स्वरूपातील घर या महिलांच्या ताब्यात दिले. त्याचा लोकार्पण सोहळा व या महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा कार्यक्रम शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

Read More  बिर्याणी खाण्यावरून वाद: मित्राच्या डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या