18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारणार

राज्यातील नाट्यगृहांची स्थिती सुधारणार

एकमत ऑनलाईन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई : जेष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांच्या नाटकांचे रेकॉर्डब्रेक १२ हजार ५०० प्रयोग पूर्ण झाल्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी शिंदे यांनी राज्यातील नाट्यगृहांसाठी मोठी घोषणा केली.

तुमच्या नाटकाचे रेकॉर्डब्रेक १२,५०० प्रयोग झाले, तसे आम्हीदेखील तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी एक महानाट्य केले, त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. राज्यात देशात आणि जगभरात त्यावेळी आम्ही प्रसिध्द झालो, असे मुख्यमंत्री प्रशांत दामले यांना म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, त्यामुळे सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्याला केंद्राचीदेखील साथ असून पीएम मोदींनीदेखील सव्वा दोनशे प्रकल्पांना दोन लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

यासोबतच ठाणे-मुंबईत एक चित्रनगरी करायची असे ठरवले असून, यामुळे एक व्यासपीठ उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी प्रशांत दामले यांनी निर्माते, कलाकर आणि प्रेक्षकांच्या वतीने राज्यातील चालू ५१ नाट्यगृहांची स्थिती लवकरात लवकर उत्तम करुन द्या, अशी थेट मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली, यावर शिंदे यांनी नाट्यगृहांची दुरुस्ती तातडीने केली जाईल. एक नोडल ऑफिसर नेमून त्यांच्याकडून राज्यातील सर्व नाट्यगृहांची पाहणी केली जाईल. नाट्यगृहांची दुरुस्ती, डागडुजीसाठी गरजेचे असेल ते तातडीने पुरवले जाईल, हे शासनाच्या वतीने मी सांगतो, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या