18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला

काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला

एकमत ऑनलाईन

कल्याण : शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असे विधान शिवसेना नेते अनंत गिते यांनी केले होते. त्याला रिपाइं नेते रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही तर काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले कल्याणमध्ये बोलत होते. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बैठकीनिमित्ताने ते कल्याणमध्ये होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केले. शिवसेना नेते अनंत गिते यांच्या टीकेवरही आठवलेंनी प्रतिक्रिया दिली. १९९८ मध्ये मी शरद पवार यांच्यासोबत होतो.

शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. काँग्रेसने शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यामुळे गिते यांचा आरोप चुकीचा आहे, असे आठवले म्हणाले. शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचे शिवशक्ती भीमशक्ती स्वप्न साकार केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

राऊतांना सल्ला
संजय राऊत हे चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहेत, त्यावर आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उलटसुलट आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राज्याच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. संजय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या