29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeमहाराष्ट्रमांजरेकरांच्या चित्रपटाचा वाद शमला

मांजरेकरांच्या चित्रपटाचा वाद शमला

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद अखेर शमला आहे. खुद्द महेश मांजरेकर यांनीच यासंदर्भात जाहीर निवेदन दिले. यामध्ये महेश मांजरेकरांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच ज्या दृश्यांवर आक्षेप घेण्यात आला, ती दृश्ये, तसेच आदी प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलरदेखील काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी या निवेदनाद्वारे जाहीर केले आहे. तसेच लोकांनी थिएटरमध्ये जाऊन पूर्ण चित्रपट पाहावा आणि आपला अभिप्राय कळवावा, असेदेखील या निवेदनात मांजरेकरांनी म्हटले आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचे मांजरेकर या निवेदनात म्हटले आहे.

नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर समाजातील ब-याच स्तरांमधून वेगवेगळ््या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा चित्रपट १८ वर्ष वयोगटापुढील प्रेक्षकांसाठीच असल्याने सेन्सॉर बोर्डानेही याला ‘ए’ प्रमाणपत्र दिले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या