36.2 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeमहाराष्ट्रमुलीच्या तेराव्यासाठी डी.एस.के कुटूंबियांना कोर्टाने दिली परवानगी

मुलीच्या तेराव्यासाठी डी.एस.के कुटूंबियांना कोर्टाने दिली परवानगी

एकमत ऑनलाईन

पुणे : बांधकाम व्यावसायिक आणि सध्या 2000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. डी.एस.के आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासह मुलगा शिरीषही सध्या कारागृहात असल्याने अंत्यसंस्काराला कुणी उपस्थित राहू शकलं नाही. आता कोर्टाने या तिघांना मुलीच्या तेराव्यासाठी काही तास घरी जाण्याची परवानगी दिली आहे.

डी.एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांना कोविड-19 चा संसर्ग झाला होता. तब्येत ढासळल्याने त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

कोरोनाच्या प्रतिबंधामुळे अंत्यसंस्कारासाठी कारागृहात असणाऱ्या कुलकर्णी कुटुंबीयांतील कुणालाही अश्विनी देशपांडेंच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी मिळाली नव्हती. आता डी.एस.के यांच्या वकिलाने किमान 13 व्याच्या विधीसाठी सूट मिळावी म्हणून कोर्टात अर्ज केला होता.

कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली आहे. आता 16 ऑगस्टला मुलीच्या तेराव्यासाठी कुलकर्णी दांपत्य आणि मुलगा शिरीष यांना काही तासांसाठी कारागृहातून घरी जायची परवानगी देण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाने हा आदेश दिला.

उपवासाच्या भगरीतून शंभर जणांना विषबाधा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या