26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख उतरणीला लागला असून, कोरोनामुक्त होणाºयांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात गुरुवारीही ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. राज्याचा रिकव्हरी रेट हा आता ९३़५२ टक्क्यांवर गेला आहे. कोरोनामुक्त होणाºयांची एकूण संख्या ही आता १७ लाख ४७ हजारांच्या जवळ गेली आहे. तर दिवसभरात ३ हजार ८२४ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही १८ लाख ६८ हजार १७२ एवढी झाली आहे़ राज्यात आज ७० जणांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत १ कोटी १५ लाखांपेक्षा जास्त कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात कोविड बाधितांचे प्रमाण हे १६.२४ टक्के एवढे आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी इशारा दिला आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू
मुंबईचे आयुक्त म्हणाले की, परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मी मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं.

स्त्रीमुक्ती : सत्य की दिखावा?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या