23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्रसध्याचे महाभारत संजय राऊतांमुळेच; दानवेंचा हल्लाबोल

सध्याचे महाभारत संजय राऊतांमुळेच; दानवेंचा हल्लाबोल

एकमत ऑनलाईन

मुंबई:  मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी-काँग्रेससोबत गेले. जनतेने भाजप-सेनेच्या युतीला कौल दिला होता पण सेनेने दगाफटका केला, असा हल्लाबोल भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दानवे म्हणाले, शिवसेना आणि भाजपचा विचार एकच आहे, विचारांवर आधारित ही युती होती. २५ वर्षे ही युती राहिली होती. परंतु ही युती असताना एकत्र विधानसभा, लोकसभा निवडणुका लढलो. जनतेने युतीला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने दगाफटका केला. राज्यातील जनतेने दिलेला कौल त्यांनी डावलला आणि मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी-काँग्रेससोबत युती केली. ही युती जनतेला मान्य नव्हती. या युतीला जनताही कंटाळली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी हा निर्णय घेतला.

पुढे ते म्हणाले, शिंदे गटाने बंड नाही उठाव केला आहे. सेनेतील आमदार-खासदारांनी उठाव केला आहे. सेना आणि भाजप युती हिंदुत्वाच्या विचारांवर चालत होती. मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी ठाकरेंनी हा दगा केला, असा घणाघातही दानवेंनी केला आहे.

ते म्हणाले, शिवसेनेतील फुटीसंदर्भात भाजपचा काहीही संबंध नाही, उलट भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आणि सेनेचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या