23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeमहाराष्ट्रपूर व दरड दुर्घटनांमधील मृतांची संख्या १९२ झाली, २५ जण अजूनही बेपत्ता

पूर व दरड दुर्घटनांमधील मृतांची संख्या १९२ झाली, २५ जण अजूनही बेपत्ता

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.२६(प्रतिनिधी) मागच्या आठवड्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमधील मृतांची संख्या १९२ झाली आहे. चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर आता या भागातील बचावकार्य थांबवण्यात आले आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात डोंगर कोसळून ८४ लोक गाडले गेले होते. यातील ५३ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर उर्वरित ३१ जणांना मृत घोषित करण्यात आले आहे. पूरग्रस्त भागातील सुमारे पावणेचार लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

मुसळधार पाऊस, पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये मागच्या आठवड्यात हाहाकार उडाला होता. या जिल्ह्यात प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. लष्कराच्या तुकड्यांसह एनडीआरएफ च्या २८, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३ तुकड्या त भागातील बचवकार्यात सक्रिय होत्या. आता या भागातील बचावकार्य थांबवण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील काही दिवस एनडीआरएफ च्या तुकड्या याच भागात तैनात असतील.

पाऊस व अन्य दुर्घटनांमुळे रायगड जिल्ह्यात ९५, साताऱ्यात ४५, रत्नागिरी जिल्ह्यात २१, कोल्हापूर जिल्ह्यात ७, तर अन्य जिल्ह्यांमध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे सांगलीतील दोन लाखाहून अधिक लोकांना, तर कोल्हापूर जिल्ह्यात दीड लाखाहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

देश प्रथम, नेहमीच प्रथम!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या