26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रपात्र असण्यात आणि जबाबदारी मिळण्यात फरक

पात्र असण्यात आणि जबाबदारी मिळण्यात फरक

एकमत ऑनलाईन

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या गोटात पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार, अशी चर्चा आहे. राज्यसभाकिंवा विधानपरिषदेत त्यांना संधी मिळेल, असे बोलले जात होते. मात्र, भाजपने राज्यसभेच्या तिस-या जागेवर धनंजय महाडिक यांना संधी दिल्याने पंकजा मुंडे समर्थकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना खोचक टोला लगावला आहे.

पंकजा मुंडे यांच्या राज्यसभा आणि विधानपरिषदेतील उमेदवारीविषयी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही विचारणा करण्यात आली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी,पंकजा मुंडे या सर्वच पदांसाठी पात्र आहेत, असे वक्तव्य केले होते. हाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना डिवचले.

देवेंद्र फडणवीस यांनी एखादी व्यक्ती पात्र आहे असे म्हटल्यावर इतर कोणीही त्यासाठी पात्र नाही, असे म्हणण्याचे काही कारण नाही. पात्र असणं आणि त्यांच्यावर जबाबदारी देणं यात अंतर आहे. हे अंतर फक्त कोठे अडचणीचे ठरू नये एवढंच, अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. आता यावर पंकजा मुंडे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या